Majhi Shala (माझी शाळा)

हसत खेळत मराठी शिकूया ....

नमस्कार,
ईस्ट बे मराठी मंडळ (EBMM) आपल्या मुलांसाठी घेऊन येत आहे एक आगळी वेगळी मराठी शाळा.

ह्या शाळेची उद्दिष्टे अशी असतील:

 • मराठी भाषेची गोडी निर्माण करणे
 • इतरांशी (आजी, आजोबा ) संवाद साधणे
 • मराठी भाषा बोलणे, वाचणे, लिहिणे
 • भाषेचे आकलन होणे
 • इतर कुटुंबियांबरोबर मराठी कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणे
 • भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून मूल्यमापन आणि प्रमाणपत्र

शाळेची काही वैशिष्ट्ये:

 • बृहन महाराष्ट्र मंडळाने ६० पेक्षा अधिक शाळांत राबवलेला यशस्वी अभ्यासक्रम
 • अभ्यासक्रमाच्या रचनेतून अनुभवात्मक शिक्षण: रचनात्मक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक उपयोगिता यांचे योग्य संतुलन
 • वय वर्षे ३ आणि पुढे
 • वय आणि क्षमतेनुसार गट -वर्गीकरण ( शिशु ते ४ थी इयत्ता असे ५ वर्ग)
 • इतर संबंधित उपक्रम:
  • खेळ
  • सहली
  • EBMMच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण
  • नाविन्यपूर्ण स्पर्धा
  • श्लोक, स्तोत्रे, कविता, नाटूकल्यांच्या सहाय्याने संस्कार आणि शिक्षण

शाळेची रचना :

 • शैक्षणिक वर्ष : सप्टेंबर ते मे
 • अध्यापन शुल्क : $ २०० प्रति विद्यार्थी प्रति वर्ष
 • इतर पुरवठा शुल्क : $ २५ प्रति विद्यार्थी प्रति वर्ष

Includes: Annual Fee + Material + Paypal Fee
Registration closed on Aug 20, 2018. Late registration will be charged fee of $10 per application.

हा प्रयत्न सामाजिक दृष्टिकोनातून करण्यात येणार आहे, तेव्हा आपले सहकार्य आम्हाला नेहमीच मिळेल हा विश्वास आहे. ह्या शाळेतील सर्व शिक्षक आणि प्रशासक हे विनावेतन स्वयंसेवक असतील.

कृपया, पुढील फॉर्म भरून आपल्या पाल्याची नोंदणी करावी. नोंदणीची शेवटची तारीख मे २०, २०१८. अधिक माहितीसाठी ऐच्छूक पालकांची एक बैठक बोलावण्यात येईल. त्यात पुढील दिशा आणि संपूर्ण माहिती दिली जाईल.

फॉर्म

About Us

East Bay Marathi Mandal is a progressive, cultural, and communal organization. Mandal's vision is to celebrate, promote and preserve the rich Indian heritage by actively engaging our community. We propagate this vision by organizing cultural and creative art events. Our ultimate goal is create a morally strong traditional legacy which encourages our future generations to work toward fulfilling the Mandal’s objectives.

A 501(c)(3) tax-exempt organization. EIN: 47-2966325