कवितांची अनोखी मेहफिल!

संदीप खरे आणि वैभव जोशी

आजच्या पिढीतील कवी म्हणून मराठी साहित्य आणि चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करणारे हे दोन कवी!

संदीप-सलील जोडीच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या विक्रमी कार्यक्रमाला सलग १३ वर्ष चाहत्यांची भरभरून दाद मिळते आहे. तर वैभव जोशीच्या कवितांवर आधारित ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमालाही नेहमीच दर्दी रसिकांची गर्दी होते आहे. दोघांचेही काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेतच पण कवितेसोबतच सिनेमा, नाटक, मालिका यासाठीही त्यांनी अनेक मान्यवर पुरस्कार मिळवले आहेत.

आता दोघांच्याही कवितांना एकाचवेळी ‘इर्शाद’ म्हणण्याची संधी इस्ट बे मराठी मंडळाने (EBMM) आपल्यासारख्या चाहत्यांना उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमात त्यांच्या प्रसिद्ध स्वरचित कविता तर असतीलच पण अनेक नवीन कविताही ऐकायला मिळतील. त्याचबरोबर मधेच त्यांच्या आवडीच्या इतर कवींच्याही कविता ते आपल्याला ऐकवतील.

थोडक्यात, Mother's Day निमित्त आम्ही घेऊन येतोय, साहित्य, कवितेशी नाळ जुळलेल्या कुठल्याही पिढीतील रसिकांसोबत रंगत जाणारी अगदी अनौपचारिक अशी मुक्त मैफिल - ‘इर्शाद’!

रंगतदार कविता ‘इर्शाद’ आणि सोबत चटकदार मेनू - साबुदाणा खिचडी, कचोरी, केक आणि चहा ... सगळ्या मातोश्रींना ही जिवाभावाची भेट द्यायला विसरू नका ... येताय ना मग... आजच तिकिटे काढून आपली जागा आरक्षित करा

Purchase Tickets

About Us

East Bay Marathi Mandal is a progressive, cultural, and communal organization. Mandal's vision is to celebrate, promote and preserve the rich Indian heritage by actively engaging our community. We propagate this vision by organizing cultural and creative art events. Our ultimate goal is create a morally strong traditional legacy which encourages our future generations to work toward fulfilling the Mandal’s objectives.

A 501(c)(3) tax-exempt organization. EIN: 47-2966325